ऑनलाईन टीम/तरुण भारत
बॉलिवूड बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) याला शनिवारी मुंबई विमानतळावर(Mumbai Airport) कस्टम विभागाने रोखलं. यावेळी शाहरुख संयुक्त अरब अमिरातीतील शारजाहहून परत आला होता. त्याच्याकडे काही महागडी घड्याळं आणि त्यांचे कव्हर होते. त्यामुळे शाहरुखला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरावी लागली.
(Shah Rukh Khan stopped at Mumbai airport for 1 hour, quizzed about customs duty)
शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. शुक्रवारी रात्री शाहरुख खान आणि त्याची टीम मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर कस्टम विभागाकडून त्यांना रोखण्यात आले. त्याच्या बॅगेचा तपासणी केली असता यामध्ये अनेक महागडी घड्याळे आढळून आली. यामध्ये बाबून आणि झुर्बक घड्याळे, रोलेक्स घड्याळांचे ६ बॉक्स, स्पिरिट ब्रँडची घड्याळे , ऍपल सिरीजची घड्याळे सापडली. सोबत घड्याळांचे रिकामे बॉक्स देखील सापडले. कस्टम्सने या घड्याळांचे मूल्यांकन केले, त्यानंतर त्यांच्यावर १७ लाख ५६ हजार ५०० रुपये कस्टम ड्युटी लावण्यात आली. जवळपास तासभर त्यांची चौकशी करुन त्याला ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरुन सोडण्यात आले. शाहरुख दुबईवरुन त्याच्या खासगी चार्टड प्लेनने मुंबई विमानतळावर पोहोचला होता. त्यानंतर त्याला टी ३ टर्मिनलवर रोखण्यात आले. सकाळी साधारण ५ वाजता त्याने दंड म्हणून ६.८३ लाखांची कस्टम ड्युटी भरली आणि त्यानंतर त्याला जाऊ दिले गेले.
हे ही वाचा : Photo: भारत जोडो यात्रेत कोल्हापुरी फेट्यांचा रुबाब
शाहरुख खान एका कार्यक्रमासाठी दुबईला गेला होता. दुबईहून येत असताना कस्टम विभागाने शाहरुखला रोखलं. तब्बल एक तास शाहरुखची चौकशी सुरू होती. किंग खानच्या बॅगमध्ये अनेक महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले. या घड्याळांची किंमत लाखो रुपये आहे. पण त्याची कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुखची चौकशी करण्यात आली. शाहरुखसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडीगार्डचीदेखील चौकशी करण्यात आली.