प्रतिनिधी /बेळगाव
शहापूर येथील महालक्ष्मी देवीचा 110 वा वाढदिवस रविवारी साजरा करण्यात आला. यानिमित्त लक्ष्मीरोड येथील लक्ष्मीस्थळ जागी पादुकांना अभिषेक व ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. याचबरोबर बसवाण गल्ली येथील महालक्ष्मी मंदिरात ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. पुढील वषी मोठय़ा उत्साहात वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला. सकाळपासूनच दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. वाढदिवसानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी लक्ष्मी स्थळ पंच व युवक मंडळाचे सदस्य बंडू पाटील, सुनील हणमण्णावर, पिंटू कोळी, किरण गावडे, शुभम नांदवडेकर, नवीन वेर्णेकर, राघवेंद्र बायकेरीकर, मंगेश बाळेकुंद्री, निखिल हबीब, युवराज नांदवडेकर, दीपक सावळेकर, सुंदर केळवेकर, सूरज पाटील, मोहन सप्रे, शिवाजी कुरणकर, सुरेंद्र जाधव, अनुप कुटे, गजानन गौंडाडकर, निखिल मासेकर, संदीप जाधव, संदीप पाटील, राजू आकाशे, गजानन बेन्नाळकर यासह इतर उपस्थित होते.