Tarun Bharat

Dasra Festival Kolhapur : शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट आज सुरू; विविध कलांचे आणि खाद्यपदार्थांची पर्वणी

महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंप मार्गावर आयोजन

Advertisements

कोल्हापूर : दसरा महोत्सवाअंतर्गत जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेच्यावतीने आज मंगळवार ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट साजरा करण्यात येणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर ( Deepak Kesarkar) यांच्या संकल्पनेतून व दसरा महोत्सव संयोजन समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती ( Malojiraje chhatrapati ) यांच्या पुढाकाराने होणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार (Rahul Rekhawar )यांनी केले आहे.

नक्की वाचा >>> काम केलं की जाहिरात करण्याची गरज पडत नाही; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

महावीर कॉलेज ते स्टार बझार, खानविलकर पेट्रोल पंप या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन कमानी उभा करुन बचत गटांचे १५० स्टॉल्स उभे केले आहेत. या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या मेजवाणीबरोबरच विविध वस्तुचे स्टॉल्स, मुलांना खेळण्यासाठी खेळणी ठेवण्यात आली आहेत. याचबरोबर लेझीम, झांजपथके, गरबा नृत्य, ड्राईंग, स्केचींग, लाठीकाठी, झिम्मा फुगडी, मेहंदी, फनी गेम्स, पारंपरिक खेळ असतील. गोट्या, टायर फिरवणे, विटी-दांडू, कुस्ती, चुयीमुयी, गजगे असे पारंपरिक खेळ खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर नृत्य, गायन, मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित केले आहेत.

या ठिकाणी महापालिकेच्यावतीने लाईटची व्यवस्था, वैद्यकीय पथक, अग्निशमन गाडी, पिण्याच्या पाण्याचा टँकर आदी सुविधा ठेवण्यात येणार आहेत. दोन ठिकाणी १०० फुटी डी.पी.रोड व महावीर कॉलेज या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर महापालिका मुख्य इमारत व शहरातील मुख्य पुतळयांभोवती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या फेस्टीवलचे संयोजन शाही दसरा उत्सव समितीने केले आहे.
दसरा महोत्सव लोकसहभागातून अधिक व्यापक आणि अधिक भव्य स्वरुपात साजरा करण्यावर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब या ‘शाही दसरा फेस्टिवल स्ट्रीट’ला भेट द्यावी, तसेच दसरा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन व महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

कोल्हापूर : स्वच्छता गृहावर पन्हाळगड, राधानगरी धरणाच्या चित्राने संताप

Archana Banage

कुरुंदवाडात धार्मिक एकात्मतेची वीण घट्ट, मशिदीत गणरायाची प्रतिष्ठापना

Archana Banage

काळम्मावाडी धरणातून ३६०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Archana Banage

शिवाजी पार्कातील 15 झोपड्या जळून खाक, 10 लाखांचे नुकसान

Archana Banage

अथणी शुगर्सचे अंतिम बिल २८०० रुपये प्रमाणे

Archana Banage

एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम

Archana Banage
error: Content is protected !!