ऑनलाईन टीम/तरुण भारत :
बसर्गे शहीद जवान प्रशांत जाधव यांचे नुकतेच लढा किती झालेल्या लष्कराच्या वाहनाच्या अपघातांमध्ये वीरमरण प्राप्त झाले होते. २ दिवसापूर्वी मिळालेल्या बातमीनुसार आपल्या कपाळावरील कुंकू न पुसण्याचा निर्णय शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पत्नीने घेतला होता.
कोणत्याही स्त्रीसाठी तिच्या कपाळावरील कुंकू म्हणजे जीव की प्राण असतो. असे कुंकू म्हणजे सौभाग्याचं लेणं असे मानून त्या समाजात वावरत असतात. पण जेव्हा तिचा नवरा वारतो तेव्हा समाजात परंपरागत चालत आलेल्या अनिष्ठ प्रथेनुसार कुंकू पुसले जाते आणि अशा स्त्रीला एक विधवा म्हणून आयुष्य जगावे लागते.
पण हेरवाड गावाने अनिष्ट प्रथा बंद करून एक नवीन आदर्श निर्माण केला होता. हाच आदर्श पुढे चालू ठेवण्याचा निर्णय शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पत्नीने घेतला आहे. त्यानुसार कपाळावरील कुंकू तसेच ठेवून विधवा प्रथेला विरोध दर्शवला आहे. याची साध्य\या संबंध महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे.