Tarun Bharat

‘हा’ अभिनेता साकारणार शाहीर साबळेंची भूमिका

Advertisements

तरुणभारत ऑनलाइन टीम

मराठी लोकसंस्कृतीला समाजात ओळख मिळवून देणारी महाराष्ट्राची लोकधारा आणि गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत कानावर पडताचदिवंगत शाहीर साबळे आठवतात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते आणि दिग्दर्शक देखील होते.त्यांचं आयुष्य आत्ता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.तर या चित्रपटात शाहीर साबळेंची भूमिका अभिनेता अंकुश चौधरी साकारणार आहे.

महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.‘महाराष्ट्र शाहीर’ असं या सिनेमाचं नाव असून केदार शिंदे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.यासोबतच अजय- अतुल या जोडीचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. केदार शिंदे यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.‘ महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा जाहीर झाला त्या दिवसापासून रसिक प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. शाहीर साबळे ह्यांचा भव्य दिव्य जीवनपट मोठ्या पडद्यावर कोणता कलाकार साकारणार? शाहीर साबळे ह्यांनी महाराष्ट्राला दिलेला संगीताचा अभूतपूर्व ठेवा आजच्या काळात पुन्हा जिवंत करण्याचं कार्य कोण संगीतकार पार पाडणार? ह्या महाराष्ट्र दिनी, ह्या काही प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत आमच्या मोशन पोस्टरद्वारे.. महाराष्ट्र शाहिराचा प्रेरणादायी जीवनपट महाराष्ट्राला अर्पण होणार…,’अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Related Stories

तुमच्या तोंडात साखर पडो

Patil_p

सांगली ते बारामती, कराड ते पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्व्हेक्षण कधी ?

Abhijeet Shinde

चित्रपट अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे कर्करोगाने अमेरिकेत निधन

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 1 लाख 75 हजार 143 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

मुंबई : दिलीप कुमार यांची प्रकृती बरी नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करा!

Rohan_P

अमोल कोल्हेंनी शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊतांची घेतली भेट, ट्वीट करत म्हणाले…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!