Tarun Bharat

शाहू माने व मेहुली घोष यांचा सुवर्णवेध

पाचगाव/वार्ताहर

कोरीया चांगवान येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विश्व चषक शुटींग स्पर्धेमध्ये कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू तुषार माने याने भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करताना त्याच्या संघातील मेहुली घोष हिच्या साथीने १० मीटर एअर रायफल मिश्र या प्रकारामधे बुधवारी सुवर्ण पदक जिंकले.

पात्रता फेरीमध्ये शाहू व मेहुली यांनी सहभागी ३० संघातील स्पर्धकांमधे सर्वाधिक ६३४ः३ गुण पटकावत प्रथम तर हंगेरीयन संघाने ६३०ः३ गुण घेऊन पात्रता फेरीमधे द्वितीय स्थान पटकावत थेट सुवर्ण पदकासाठी अंतिम फेरीमधे प्रवेश मिळविला.

अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धक हंगेरी संघामधील ऑलिंपियन ईस्तवान पेनी व ईस्तर मेसझारोस हे दोघेही भारतीय खेळाडूंपेक्षा अनुभवी असलेने त्यांचेकडून चांगली सुरवात झाली. मात्र शाहू व मेहुली यांनी जोरदार प्रतिकार करुन १७ विरूध्द १३ अशी मात करत सुवर्ण पदक जिंकले.

हे हा वाचा : ७५ वा स्वातंत्र्यदिन, ७५ दिवस नागरिकांना मोफत बूस्टर डोस

शाहू या स्पर्धेमध्ये सांघिक प्रकारामधूनही भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. अर्जुन बबूता (पंजाब) व पार्थ माखिजा (दिल्ली) यांच्यासह भारतीय संघ पात्रता फेरीत द्वितीय स्थान पटकावून थेट सुवर्ण पदक लढतीसाठी पात्र झाला आहे. गुरूवारी त्यांची यजमान कोरीया संघाबरोबर सुवर्ण पदकासाठी लढत होणार आहे. तर भारतीय संघाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या प्रशिक्षिका सुमा शिरुर यांनी शाहूने गुरु पौर्णिमा दिवशी सुवर्ण पदक मिळविलेने समाधान व्यक्त केले आहे.

Related Stories

राजस्थानमध्ये 87 नवे कोरोना रुग्ण, एकूण संख्या 4 हजार 213 वर

Tousif Mujawar

माजी टेबलटेनिसपटू व्ही. चंद्रशेखर यांचे कोरोनाने निधन

Patil_p

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला सिंधू उपस्थित राहणार

Patil_p

मलेशियाचे टॅन किम हेर प्रशिक्षकपदी

Patil_p

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ स्पष्टीकरणावर प्रियांका गांधी म्हणाल्या, माजरा क्या है?

Archana Banage

महिलेचा विनयभंग करणाऱ्या मजनूविरोधात तक्रार दाखल

Abhijeet Khandekar