शाहुवाडी/प्रतिनिधी
आंबा ता.शाहूवाडी येथील मंडल अधिकारी संतोष सांगडे व त्यांचा पंटर मुबारक उस्मान मुजावर रा.विशाळगड ता.शाहूवाडी यांच्याविरोधात वारस नोंदीसाठी पाच हजार रूपयेची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडून शाहूवाडी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पोलिसांनी पंटर मुबारक मुजावर यास ताब्यात घेण्यात आले आहे.
अधिक वाचा- ‘मेरे पैर जल रहे हैं…’, मुलाच्या ‘त्या’शब्दांनी घायाळ झाला इंदौरचा ट्राफिक पोलीस रणजित
याबाबत अधिक माहिती अशी की, मंडलाधिकारी संतोष सांगडे याने बावीस वर्षीय तक्रारदाराचे वडील मयत झाल्यानंतर शेत जमिनीवरील वारस नोंद मंजूर केली म्हणून त्यांचा खाजगी पंटर मुबारक मुजावर यांच्यामार्फत पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती.याप्रकरणी तक्रारदारांने मंडलाधिकारी व पंटर विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यांची लाच प्रतिबंधक कार्यालयामार्फत मंडल अधिकारी सांगडे यांच्याकडे जावून पडताळणी केली असता, त्यांने वारस नोंद मंजूर केल्यानंतर त्यांचा पंटर खाजगी इसम मुबारक मुजावर यास भेटण्यास सांगितले. त्यानुसार भेट घेतली असता लाच स्विकारताना लाच प्रतिबंधक कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचा-यांनी सापळा रचून पंटर मुजावरला ताब्यात घेतले. ही कारवाई लाच प्रतिबंधक खात्याचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि नितीन कुंभार, सहा. पो. उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पो. ना. विकास माने, सुनील घोसाळकर, पो.कॉ.रुपेश माने, पो.हे.कॉ.सुरज अपराध, विष्णू गुरव यांच्या पथकाने केली.