शाहूवाडी/प्रतिनिधी
कावरीबावरी भेदरलेली नजर ओळखीचं कोणीच नाही कोणाचा आधार शोधायचा अशा विमनस्क भेदरलेल्या अवस्थेत मलकापूर बाजारपेठेत फिरत असलेल्या प्रथमेश कृष्णात शिंदे याला शाहूवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे नातेवाईक भेटण्यास मदत झाली नातेवाईकांचा आधार मिळाल्याने बालकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
अवघ्या नववर्षाच्या प्रथमेश शिंदे हा मलकापूर बाजारपेठेतून बेवारस पणे फिरत असताना शाहूवाडी पोलिसांच्या निदर्शनास आला घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुयश पाटील यांनी त्याच्याकडे चौकशी केल. प्रथमेश देत असलेल्या माहितीच्या आधारे त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतल. मात्र त्याचे नातेवाईक आढळून आले नाहीत. अखेर बाल संकुल कोल्हापूर येथे त्याला दाखल करण्यात आले. मात्र सदरची बातमी समजताच त्याच्या नातेवाईकांनी शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधला व एका बेवारस बालकाला नातेवाईकांचा आधार मिळाला.
शाहूवाडी पोलीसांची सतर्कता व तत्परता यामुळेच एका बेवारस बालकाला नातेवाईकांचा आधार लाभल्याने नागरिकांच्यातुन समाधान व्यक्त होत आहे.