शाहूवाडी प्रतिनिधी
Rajaram Sugar Factory Election : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ‘कडवे येथील मतदान केंद्रावर दोन्ही आघाडीकडून मतदान करून घेण्यासाठी चांगली चुरस निर्माण झाली आहे. मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय केली आहे. तर प्रवेशद्वारावर स्वागतासाठी दोन्ही आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते थांबवून आहेत.
पहा : LIVE : सत्ताधाऱ्यांच्या आक्षेपानंतर पोलिसांनी अगंठी चिन्ह काढायला लावले
अत्यंत चुरशीन सुरू असलेल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शाहूवाडी तालुक्याची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील या दोन्ही प्रमुख नेते मंडळींनी तालुक्यातील मतदारांशी संपर्क साधून सहकार्य करण्याचा आव्हान केल आहे. यामुळे मतदाना दिवशी देखील दोन्ही आघाडीकडून विशेष सतर्कता घेतली होती.
तालुक्यात कडवे येथे असलेल्या मतदान केंद्रावर सकाळपासूनच कार्यकर्त्यांसह प्रमुख नेते मंडळीनी उपस्थित दर्शवली होती. बाहेरच्या मतदारांना आणण्यासाठी विशेष वाहनांची सोय केली जात होती. सकाळच्या सत्रात मतदानाला चांगलीच चुरश निर्माण झाली होती.