Tarun Bharat

शकीब अल हसन कोरोना चाचणीत निगेटिव्ह

Advertisements

वृत्तसंस्था/ ढाक्का

बांगलादेश संघातील अष्टपैलू शकीब-अल-हसन कोरोना चाचणीत निगेटिव्ह  ठरल्याने तो आता लंकेविरूद्ध होणाऱया पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता आहे. ही पहिली कसोटी रविवार दि. 15 मे पासून सुरू होणार आहे.

शुक्रवारी शकीब-अल-हसनने चेतोग्राम येथे प्रयाण केले. लंकेविरूद्ध होणाऱया पहिल्या कसोटीसाठी शकीब हसनची तंदुरूस्ती चाचणी तसेच वैद्यकीय तपासणी केली जाईल, अशी माहिती या संघाचे प्रमुख प्रशिक्षक डॉम्निगो यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी शकीबला कोरोनाची बाधा झाली होती. वैद्यकीय उपचार आणि विलगीकरणानंतर शकीब आता यावर मात करु शकला आहे. पहिल्या कसोटीसाठी बांगलादेश संघामध्ये शकीब अल हसन 11 मे रोजी दाखल होणार होता. पण, कोरोना चाचणीमुळे त्याला तीन दिवस उशिराने संघामध्ये दाखल व्हावे लागत आहे. 

Related Stories

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांचा राजीनामा

Patil_p

आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप आजपासून

Patil_p

न्यूझीलंडकडूनही आयपीएल भरवण्याचा प्रस्ताव

Patil_p

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंकडून कोव्हिड योद्धय़ांचा गौरव

Patil_p

कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत प्रवेश

datta jadhav

दक्षिण आफ्रिका- इंग्लंड तिसरी कसोटी उद्यापासून

Patil_p
error: Content is protected !!