Tarun Bharat

बांगलादेश संघात शकीब अल हसनचे पुनरागमन

Advertisements

वृत्तसंस्था/ ढाका

यजमान बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका बांगलादेशमध्ये खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 15 मे पासून चित्तगाँगमध्ये सुरू होणार असून या मालिकेसाठी अष्टपैलू शकीब अल हसनचे बांगलादेश कसोटी संघात पुनरागमन झाले आहे.

अष्टपैलू शकीब अल हसन यापूर्वी दक्षिण आफ्रिकाविरूद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत काही वैयक्तिक समस्यामुळे सहभागी झाला नव्हता. दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत बांगलादेशचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला आहे. लंका आणि बांगलादेश यांच्यातील ही दोन सामन्यांची कसोटी मालिका आयसीसीच्या कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत आहे. या मालिकेतील दुसरा सामना 23 मे पासून ढाका येथे खेळविला जाईल. या मालिकेसाठी बांगलादेशचे नेतृत्व मोमिनुल हककडे सोपविण्यात आले आहे.

बांगलादेश संघ-मोमिनुल हक (कर्णधार), तमीम इक्बाल, मेहमूदुल हसन जॉय, नझमुल हुसेन, मुश्फिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास, यासीर अली, तैजुल इस्लाम, मेहदी हसन मिराज, इबादत हुसेन, खलीद अहमद, नुरूल हसन, रेजॉर रेहमान रझा, शोहिदुल इस्लाम, शौरीफुल इस्लाम.

Related Stories

डरेन गॉ पंचगिरी करणार नाहीत

Amit Kulkarni

राजस्थान, सनरायजर्स यांना आज विजय आवश्यक

Omkar B

थिएगो अलकांटरा लिव्हरपूलमध्ये दाखल

Patil_p

हॉकी स्पर्धा आयोजनासाठी निमंत्रण

Patil_p

स्पेनची मुगुरूझा उपांत्य फेरीत

Patil_p

भारत अ संघाचा एकतर्फी वनडे मालिका विजय

Patil_p
error: Content is protected !!