वृत्तसंस्था/ चेतोग्राम
भारताविरुद्ध होणाऱया आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बांगलादेशने 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघामध्ये अनुभवी शकीब अल हसनचे पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघ या मालिकेसाठी बांगलादेशच्या दौऱयावर जाणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने ढाक्मयातील शेर ए बांगला नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 4 आणि 7 डिसेंबरला खेळविले जातील. तर या मालिकेतील शेवटचा सामना चितगाँगच्या झेहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये आयोजित केला आहे. बांगलादेश संघामध्ये अनुभवी शकीब अल हसनचे गेल्या जुलै-ऑगस्ट महिन्यानंतर पुनरागमन होत आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शकीबला वगळण्यात आले होते. भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी महत्त्वाचे खेळाडू मोसादेक हुसेन, शोरीफुल इस्लाम आणि ताजुल इस्लाम यांना बांगलादेश संघातून डच्चू देण्यात आला आहे. अलीकडेच झालेल्या टी-20 स्पर्धेमध्ये मोसादेक हुसेनची कामगिरी चांगली झाली नव्हती. त्यामुळे त्याला वनडे संघातूनही वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. 26 वषीय मोसादेक हुसेनने टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाच सामन्यातून केवळ 38 धावा जमविल्या होत्या. या मालिकेसाठी भारतानेही आपला संघ यापूर्वीच घोषित केला असून रविंद्र जडेजा आणि यश दयाल यांना दुखापतीमुळे संघात स्थान मिळू शकले नाही.
बांगलादेश संघ- तमिम इक्बाल (कर्णधार), लिटॉन दास, अनामूल हक्क, शकीब अल हसन, मुश्तफिजूर रहीम, अफिफ हुसेन, यासीर अली, मेहदी हसन, मुस्ताफिजूर रेहमान, तस्कीन अहमद, हसन मेहमूद, इबादत हुसेन, नसुम अहमद, मेहमूद उल्ला, नजमुल हुसेन, नुरुल हसन.