Tarun Bharat

पूरस्थितीवर मात करण्यासाठी युतीचं सरकार कामाला लागलं; शंभूराजे देसाई

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

विधानसभा बैठक संपल्यानंतर मतदार संघातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकणपट्ट्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. पश्चिम महाराष्ट्रात जर पूरस्थिती निर्माण झाली तर संबधित अधिकाऱ्यांना पूर्वसूचना देऊन नागरीकांना मदत करा असेही सांगण्यात आले आहे. ठराव संमत झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील पालक सचिवांना आपापल्या जिल्ह्यात जाण्यास सांगितले आहे. ज्या भागात गतवर्षी पूरस्थिती निर्माण झाली होती त्या भागात आधीच तयारी करण्याच्या सूचना विधासभा सदस्यांना देण्यात आल्या आहेत. आज मी ही मतदारसंघात जाणार आहे. आढावा घेतल्यानंतर आज दुपारी तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनेच्या सूचना देणार असल्याची माहिती मंत्री शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा- नवं सरकार स्थापनेनंतर मुलाखतीत काय म्हणाले बच्चू कडू; जाणून घ्या सविस्तर

यावेळी बोलताना ते म्हणाले, युतीचं सरकार कामाला लागलं आहे. युतीच्या जीवावर आम्ही मतं मागितली. पण पक्षप्रमुखांनी मविआ सोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या अडीच वर्षात शिवसेनेची गळचेपी झाली आहे. ती सहन करण्यापलीकडे गेली होती. आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं होतं पक्षप्रमुखांना याची कल्पना द्या. मात्र यावर काही उपाय झाला नाही. म्हणून आम्हाला उठाव करायला लागला. ५५ पैकी ४० सेनेच्या आमदारांनी, तर ११ अपक्ष आमदारांनी साथ दिली आणि त्यामुळेचं युतीचं सरकार आलं.

हेही वाचा- आता! संपर्काबाहेर जात नाही, राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या मनसोक्त गप्पा

येणाऱ्या अडीच वर्षात विकासाचा बॅकलाॅग भरून काढणार आहोत. केंद्र आणि राज्याचा एक विचार होतो तेव्हा राज्याचा जलद विकास होतो. शिंदे-फडणवीस अनुभवी आहेत. सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारे मंत्री, नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व आमदार काम करणार आहोत. अधीक जलद गतीने राज्यातील विकासाची कामे आता होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे – पोलीस अधीक्षक

Archana Banage

खा. उदयनराजेंना जिल्हा बँकेत येवूच न देण्यासाठी राष्ट्रवादीची व्युहरचना

datta jadhav

मराठा आरक्षण रद्द झाल्याबाबत राजधानीतून तीव्र संताप

Patil_p

सातारा जिल्ह्यात जागर अस्मितेचा अभियान सुरू

Archana Banage

मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

datta jadhav

शेतकऱ्यांना संकटातून तातडीनं बाहेर काढणं गरजेचं; अजित पवारांनी घेतली राज्यपालांची भेट

Abhijeet Khandekar