अभिनेता संजय कपूरची मुलगी
बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महिप कपूर यांची मुलगी शनायाने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरीही ती कुठल्या न कुठल्या कारणाने सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहते. यावेळी 23 वर्षीय शनाया स्वतःच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. शनाया एकाला डेट करत असल्याचे समजते.
शनाया स्वतःच्या बॉयप्रेंडसोबत बॉलिवूडच्या पाटर्य़ांमध्ये सामील होत असून सर्व लोकांना त्याची ओळख स्वतःचा पार्टनर म्हणून करून देत असल्याचे बोलले जात आहे. शनाया ही मुंबईतील करण कोठारीला डेट करत आहे. दोघेही परस्परांना कधीपासून डेट करत आहेत हे अद्याप समोर आलेले नाही. दोघांनीही लॉस एंजिलिस युनिव्हर्सिटीत एकत्र शिक्षण घेतल्याचे समजते. करणचा बॉलिवूडशी कुठलाच थेट संबंध नाही, शनाया देखील सोशल मीडियावर करणसंबंधी काहीही पोस्ट करणे टाळत आहे. शनाया ही ‘बेधडक’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती, परंतु आता हा चित्रपट गुंडाळण्यात आल्याची चर्चा आहे. शनाया लवकरच स्वतःच्या पहिल्या चित्रपटात टायगर श्रॉफची नायिका म्हणून झळकणार असल्याचीही चर्चा आहे.