एमआय अमिरात संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी शेन बाँड
वृत्तसंस्था/ दुबई
संयुक्त अरब अमिरात टी-20 लीग स्पर्धेत सहभागी होणाऱया एमआय अमिरात (मुंबई इंडियन्स अमिरात) संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडची प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शेन बाँड सध्या मुंबई इंडियन्स संघाचा गोलंदाज प्रशिक्षक असून त्याच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्स संघाच्या सध्या असलेल्या प्रशिक्षण पथकात माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि विनयकुमार यांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी पार्थिव पटेल तर गोलंदाज प्रशिक्षकपदी विनयकुमार त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी जेम्स प्रँक्लीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेन बाँड या संघाचा प्रमुख प्रशिक्षक असेल. संयुक्त अरब अमिरात क्रिकेटमधील बराच अनुभव असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंग हा मुंबई इंडियन्स अमिरात संघाचा सरव्यवस्थापक राहिल.
2015 साली शेन बाँड पहिल्यांदा मुंबई इंडियन संघात दाखल झाला होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्स चारवेळा अजिंक्यपद पटकाविले होते. 2010 साली रॉबिन सिंग मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षक वर्गामध्ये दाखल झाला होता. त्याने पाच आयपीएल क्रिकेट स्पर्धेत तसेच दोन चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धेत शेन बाँडसमवेत मुंबई इंडियन्स खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज पार्थिव पटेल हा आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा प्रतिनिधी म्हणून कार्यरत होता. 2020 पासून पार्थिव पटेल आणि विनयकुमार यांचा मुंबई इंडियन्स संघाच्या प्रशिक्षण पथकात समावेश झाला होता. 2015 आणि 2017 साली आयपीएल स्पर्धा जिंकणाऱया मुंबई इंडियन्स संघामध्ये पार्थिव पटेल आणि विनयकुमार यांचा सहभाग विशेष म्हणून गणला गेला. मुंबई इंडियन्स संघाचे क्षेत्ररक्षण सुधारण्यासाठी आता जेम्स प्रँक्लीन यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
संयुक्त अरब अमिरातमध्ये होणाऱया पहिल्या टी-20 लिग स्पर्धेसाठी एमआय अमिरात संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी काही जुन्या आणि काही नवोदित क्रिकेटपटूंना संधी देण्यात आली आहे. सदर स्पर्धा अबुधाबीमध्ये खेळविली जाणार आहे.