Tarun Bharat

शंकर मारिहाळ केंद्रीय गृहमंत्री पदकाचे मानकरी

Advertisements

मोदगा गावच्या सुपुत्राच्या कामाची दखल

प्रतिनिधी /बेळगाव

हुबळी येथील हेस्कॉमचे पोलीस अधीक्षक शंकर मारिहाळ यांना 2022 साठीच्या उत्कृष्ट तपास कामाबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक जाहीर झाले आहे. या यादीत कर्नाटकातील सहा पोलीस अधिकाऱयांचा समावेश आहे.

शंकर मारिहाळ हे मूळचे मोदगा (ता. बेळगाव) गावचे सुपुत्र आहेत. यापूर्वी त्यांनी बेळगाव येथील मार्केटचे पोलीस निरीक्षक, एसीपी, निपाणी, खडेबाजार पोलीस स्थानकातही सेवा बजावली आहे. सध्या हुबळी येथील हेस्कॉम विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत.

देशभरातील 151 पोलीस अधिकाऱयांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे पदक जाहीर झाले आहे. त्यात कर्नाटकातील 6 पोलीस अधिकाऱयांचा समावेश आहे. लोकायुक्त कार्यालयातील एसपी के. लक्ष्मी गणेश, रायचूर जिल्हय़ाच्या सिंधनूर उपविभागाचे डीवायएसपी वेंकटप्पा नायक, गुलबर्गा सीआयडीचे डीवायएसपी शंकरेगौडा पाटील, लोकायुक्तचे डीवायएसपी एम. आर. गौतम आणि दावणगेरेच्या बसवनगर पोलीस स्थानकाचे सीपीआय एच. गुरुबसवराजू यांना गृहमंत्री पदक प्रदान करण्यात येणार आहे.

Related Stories

महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

Abhijeet Shinde

शुभम शेळके यांना दोन्ही प्रकरणात जामीन

Amit Kulkarni

जिल्हाधिकाऱयांकडून मतदान केंद्रांची पाहणी

Omkar B

आमदार बेनके यांच्याकडून सरकारी शाळांची पाहणी

Patil_p

पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटकरत्न पुरस्कार

Sumit Tambekar

विनय युथ फौंडेशनचे दहा हजारांहून फुड पॅकेटचे वाटप

Amit Kulkarni
error: Content is protected !!