Tarun Bharat

पुत्रासाठी शंकर सिंह वाघेलांचा जोरदार प्रचार

बायड मतदारसंघात चुरशीची लढत ः अपक्षामुळे फटका बसण्याची शक्यता

गुजरातच्या अरावली जिल्हय़ातील बायड विधानसभा मतदारसंघात स्थानिक मुद्दे तसेच सत्ताविरोधी लाटेपेक्षा अधिक एक पक्षांतर केलेला नेता किती मते घेणार यावर निकाल अवलंबून असणार आहे. माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांचे पुत्र महेंद्र सिंह यांनी 2012 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर बायड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती, परंतु नंतर ते भाजपमध्ये सामील झाले होते. यावेळी महेंद्र सिंह हे काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत गुजरातच्या राजकारणातील प्रमुख नेते शंकरसिंह वाघेला यांना बायड मतदारसंघात तळ ठोकला आहे. स्वतःच्या पुत्राला विजयी करण्यासाठी त्यांनी जोरदार प्रचार केला आहे.

उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱया बायड मतदारसंघात आज मतदान होणार आहे. येथे मुख्य लढत काँग्रेसचे महेंद्र सिंह आणि भाजप उमेदवार भीखीबेन परमार यांच्यातच आहे, याचदरम्यान एक प्रभावशाली अपक्ष उमेदवार धवलसिंह जाला हे चर्चेत आहेत.

मागील निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसने विजय मिळविला होता. बायडमध्ये 56 टक्के मतदार हे ठाकोर समुदायाचे असून अनुसूचित जातीचे 7 टक्के, अनुसूचित जमातीचे 2 टक्के तर उर्वरित मतदार हे पटेल समुदायाचे आहेत. या मतदारसंघातील 89 टक्के मतदार हे ग्रामीण क्षेत्रातील आहेत.

या भागातील ठाकोर समुदाय मागील अनेक निवडणुकांपासून काँग्रेसच्या पाठिशी उभा राहिला आहे. 2007 मध्ये भाजपने येथे विजय मिळविला होता. परंतु 2012 मध्ये काँग्रेसने यावर पुन्हा कब्जा केला होता. 2017 मध्ये काँग्रेसचे धवलसिंह जाला यांनी येथे विजय प्राप्त केला होता.

काँग्रेसचा या मतदारसंघातून निवडून आलेला आमदार भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने पक्षाला प्रत्येकवेळी उमेदवार बदलावा लागला होता. महेंद्रसिंह यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर जाला यांनी 2019 मध्ये राज्यसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षांतर होऊनही काँग्रेसने 2019 च्या पोटनिवडणुकीत बायड मतदारसंघ राखला होता. परंतु महेंद्र सिंह वाघेला यांनी मागील महिन्यात काँग्रेसमध्ये परतून उमेदवारी मिळविली आहे.

काँग्रेसने मागील 10 वर्षांमध्ये या मतदारसंघासाठी काहीच केलेले नाही. येथील शेतकरी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या भागाचा विकास केवळ भाजपच करू शकते असा दावा भाजप उमेदवार भीखीबेन परमार यांनी केला आहे. तर विजय कुणाचा होणार हे बऱयाचअंशी धवलसिंह जाला कुणाची मते मिळविणार यावर अवलंबून असणार आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. गुजरात क्षत्रिय ठाकोर सेनेचे ते उपाध्यक्ष आहेत.

Related Stories

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 4 लाखाचा टप्पा

datta jadhav

राज्यात निम्मे रुग्ण संसर्गमुक्त

Patil_p

‘आयएमए’च्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा’

Archana Banage

चर्चा पुन्हा अनिर्णित

Patil_p

अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

Patil_p

शिरोमणी अकाली दलानंतर ‘जेजेपी’ची साथ सोडणार ?

Patil_p