Tarun Bharat

शरद पवार गोव्यात दाखल

Advertisements

Sharad Pawar entered Goa

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे गोवा येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विक्टर डॉन्टस , प्रसाद रेगे  गोवा राज्य प्रदेश अध्यक्ष जूझे फिलीप. अबीद नाईक आधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी श्री पवार यांचे स्वागत केले श्री पवार कित्येक महिन्यानंतर गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

यावेळी श्री पवार यांनी गोवा व कोकणातील एकंदरीत राजकीय सामाजिक सहकार याबाबतची माहिती जाणून घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला येथे स्व बॅरिस्टर नाथ पै यांच्या १०० वी जयंती कार्यक्रमास ते उद्या शनिवारी १ ऑक्टोबर ला येणार आहेत . त्या पार्श्वभूमीवर ते आज गोव्यात विमानाने दाखल झाले . यावेळी विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडाने भेट घेत त्यांचे जंगी स्वागत केले.

पणजी/ प्रतिनिधी

Related Stories

एसटी नसली तरी, ‘शाळा आपल्या दारी’

NIKHIL_N

विठलापुरातील विवाहित महिलेचा पुण्यात खून

Archana Banage

पाकला मदत करण्यास फ्रान्सचा नकार

datta jadhav

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी घेतले श्रीदत्त दर्शन

Patil_p

इटली, स्पेन, फ्रान्समध्ये गंभीर संकट

tarunbharat

प्रियंका गांधींना UP पोलिसांनी घेतले ताब्यात

datta jadhav
error: Content is protected !!