Tarun Bharat

धनुष्यबाण चिन्हावरून शरद पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला; म्हणाले, …तर वेगळा पक्ष काढू शकता

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यांनतर शिवसेनेत उभी फूट पडली. ४०हुन अधिक आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे शिवसेना कोणाची? आणि धनुष्यबाण कोणाचं? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. तसेच निवडणूक आयोगानं ठाकरे आणि शिंदे गटाला मूळ शिवसेना कोणाची? याबाबतचे पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे. तर बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून शरद पवारांनी (Sharad Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला दिला आहे.

शिवसेनेतील आमदारांबरोबर घेऊन मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेवरही ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या वादावर शरद पवार यांनी भूमिका मांडली. “धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह आहे. एखाद्या पक्षाचे चिन्ह काढून घेणं योग्य नाही. जर एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल, तर वेगळा पक्ष काढू शकतात. जेव्हा मी काँग्रेसमधून बाहेर पडलो, तेव्हा वेगळा पक्ष काढला. वेगळं चिन्ह घेतलं. त्यांचं चिन्ह आम्ही मागितलं नाही. यातून वादविवाद वाढवणं योग्य नाही”, असं शरद पवार एकनाथ शिंदेंना म्हणाले.

हे ही वाचा : Bacchu Kadu: सध्या धोका देणाऱ्यांचं राज्य- बच्चू कडू

सर्वोच्च न्यायालयात धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारलं असता, शरद पवार म्हणाले, “धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या आणि त्यांच्या विचारांपासून स्वीकारलेलं हे चिन्ह आहे. त्यामुळे एखाद्या राष्ट्रीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं आणि त्यातून वाद-विवाद निर्माण करणं योग्य नाही. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना जर वेगळी भूमिका घ्यायची असेल तर, ते जरूर स्वत:चा पक्ष काढू शकतात आणि स्वत: वेगळं चिन्ह ठरवू शकतात.”

Related Stories

‘आप’ खासदार संजय सिंग यांच्या घरावर हल्ला ; दोन जण ताब्यात

Rohan_P

कोटामध्ये अडकलेले 7500 विद्यार्थी घरी परतणार

prashant_c

कोरोनाचा कहर : महाराष्ट्रात मागील 24 तासात 519 मृत्यू; 62,097 नवे रुग्ण

Rohan_P

पुणे विभागातील 1 लाख 27 हजार 529 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची ईडीकडून आठ तास चौकशी

datta jadhav

भाजप सरकार असताना अशा प्रकरेच अहवाल होत होते का ? : रोहित पवार

Rohan_P
error: Content is protected !!