Tarun Bharat

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी सदावर्तेंना जामीन मंजूर

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता अॅड. गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) यांच्यासह 115 जणांना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai CityCivil Court) सदावर्तेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय अकोल्यातील अकोट सत्र न्यायालयानेदेखील स
वर्ते दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (Mumbai Session Court Grant Bail To Gunaratna Sadavarte)

सदावर्तेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, शरद पवार यांच्या घरावरील हल्ला ही गंभीर घटना होती. यानंतर घटनेत कट रचल्याप्रकरणी सदावर्तेंना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आता या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून सदावर्तेंसह 115 आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे सदावर्तेंना काहीसा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने सदावर्तेंना 50 हजारांच्या जातमुचक्यावर आणि तितक्याच रकमेच्या हमी रकेमवर जामीन मंजूर केला आहे. तर कोल्हापुरातही सदावर्ते यांच्यावर गुन्हा नोंद आहे. कोल्हापूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. तसेच काल सदावर्ते यांना कोर्टात हजर केलं असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सुनावली आहे. तर आज शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने जमीन मंजूर केल्याने मोठा दिलासा मिळाला आहे .

Related Stories

केंद्रीय नेतृत्व समावेशन चर्चेच्या पार्श्वभुमीवर सचिन पायलटने राहुल गांधींची घेतली भेट

Archana Banage

अधिकाऱ्यांच्या भरवश्यावर राज्य चालवणे चिंताजनक-सतेज पाटील

Rahul Gadkar

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महावितरणचे कर्मचारी संपावर ?

Tousif Mujawar

कुर्ल्यात 4 मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

datta jadhav

शासकीय रुग्णालयातील रुग्णांना शनिवारपासून मिळणार मोफत रक्त

Tousif Mujawar

पीएम केअर्स फंडातून उभे राहणार 551 ऑक्सिजन प्रकल्प

datta jadhav
error: Content is protected !!