Tarun Bharat

पेढा भरवून पुष्पगुच्छ देणारे राज्यपाल मी पहिल्यांदाच पाहिले

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

मी १९७२ पासून १९९० पर्यंत विविध पदांची शपथ घेतली. परंतु कुठल्याही राज्यपालांनी मला पेढा भरवला नाही. परवा मुख्यमंत्रीपदाची शपथ चुकीची होत असताना राज्यपालांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पेढा भरवून मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देताना आपण पाहिले. मी ही हे पहिल्यांदाच पाहिले. चला आनंद आहे एकंदरीत त्यांनी कार्यपद्धतीत बदल केला, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला.

पुण्यात माध्यमांशी संवाद साधला असता ते बोलत होते. या वेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नव्याने आलेल्या सरकारच्या शपथविधीची आठवण करून देताना शरद पवार म्हणाले, शपथ घेताना मी टीव्हीवर पाहिले. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना स्मरून वगैरे वगैरे ते बोलले, ही शपथ दिली कुणी तर राज्यपाल यांनी. आमचे सरकार आले, त्यावेळी मी पहिल्या लाईनमध्ये बसलो होतो. आमच्या एका सदस्याने बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करून शपथेला सुरुवात केली, तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली होती. मात्र कालच्या शपथेवेळी राज्यपाल कोश्यारी यांनी हरकत घेतली नाही. याबाबत शरद पवार यांनी आश्चर्य व्यक्त केले.

आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे पाठविली होती. मुळात मंत्रिमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणे, हे बंधनकारक असते. असे असताना जवळपास अडीच वर्ष त्यांनी तो प्रस्ताव तसाच ठेवला व कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे, याविषयी चर्चा करायची गरज नाही. लोकांना हे सर्व ठाऊक आहे. आता 12 आमदारांबाबत राज्यपाल निर्णय घेणार आहेत, असे ऐकले आहे. मात्र, त्यातून महत्त्वाची गोष्ट स्पष्ट होईल. एका सरकारने अधिकृतपणे मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन नावे दिली होती, त्यावर अडीच वर्षांमध्ये कोणतीही कार्यवाही केली गेली नाही. परंतु, नवे सरकार आल्यावर त्यांच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही केली जात असेल, तर त्याला काय म्हणायचे? माझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ती कुठल्या एका बाजूची आहे, असे न पाहता निरपेक्षपणे निकाल देईल, असे धोरण हवे. परंतु आताचे राज्यपाल निरपेक्षपणाची वेगळीच व्याख्या देशवासियांसमोर ठेवत आहे. त्याकडेही आपण निरपेक्षपणे पहात आहोत, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.

Related Stories

“शिवप्रसाद काय असतो, ते आमदार वैभव नाईकांना विचारा”, नितेश राणेंचा राऊतांना टोला

Archana Banage

काँग्रेसच्या उमेदवारांनी घेतली एकजूटीची शपथ

Abhijeet Khandekar

शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती ; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत घोषणा

Archana Banage

ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे बदलून महाबळेश्वर पर्यटन स्थळांना क्रांतिकरांची नावे द्या; विक्रम पावसकर

Abhijeet Khandekar

जिल्हय़ात कोरोनाचा वाढता कहर

Patil_p

लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांचेही होणार निदान; ‘रॉश’ ला अमेरिकेची परवानगी

datta jadhav