ST Employees : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरासमोर आंदोलन केलेल्या 118 कर्मचाऱ्यांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे.याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन गेल्या महिन्यात रद्द केले आहे. त्यानंतर विविध राजकीय आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा मोठा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने काल (गुरुवारी)घेतला.
एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्यावर्षी आंदोलन केले होते. एसटी कर्मचाऱ्यांनी संपही पुकारला होता. या काळात 10 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. या संपकऱ्यांनी पवार यांच्या घरासमोर प्रचंड निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी अनेक आंदोलकांची धरपकड केली होती.
राज्य सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेत एसटीच्या 118 कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते.मात्र, राज्यात सत्तांतर झाल्याने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन गेल्या महिन्यात मागे घेतलं आहे. त्यानंतर सरकारने या कर्मचाऱ्यांना आणखी मोठा दिलासा दिला आहे.


previous post