ऑनलाईन टीम / तरुण भारत :
सावरकरांचे विचार लहान मुलांमध्ये भिनायला हवेत. इथल्या लहान मुलांनाही सावरकरांबद्दल कळतं. मुलामुलांमध्ये फरक आहे. ही मुलं पाहा आणि दिल्लीतला तो मुलगा पाहा. 50 वर्षांचा घोडा झाला तरी त्याला गोळवलकर म्हणता येत नाही, असा टोला अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाव न घेता राहुल गांधी यांना लगावला.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयात ‘मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर’ नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोंक्षे बोलत होते. पोंक्षे म्हणाले, महाराष्ट्रात एकच गोळवलकर विद्यालय का आहे. प्रत्येक गावात असे विद्यालय हवे, तसेच सावरकरांवर कार्यक्रम व्हायला हवेत. सावरकर प्रेमी आला म्हटलं की दहशत वाढली पाहिजे.
रोज सकाळी उठल्यावर विरोधकांना पण सावरकर लागतात. ही मुलं बघा अन् दिल्लीतला मुलगा बघा. या मुलांना कळतंय आणि 50 वर्षांचा घोडा झाला तरी त्याला अजून गोळवलकर बोलता येत नाही. सावरकर याचं मोठेपण मान्य करणे म्हणजे त्यांचा राजकीय तोटा आहे. सावरकर यांच्यावर बोलणारे आणि आक्षेप घेणारे जास्त आहेत, असेही पोंक्षे म्हणाले.
हेही वाचा : शिंदेंचा आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचा संकल्प ठरतोय फोल, 23 दिवसातच 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या