वृत्तसंस्था/ सुरत
येथे सुरू झालेल्या 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस या प्रकारात टॉप सीडेड टेबल टेनिसपटू तामिळनाडूचे जी. साथियान, शरथ कमल तसेच मनिका बात्रा यांनी एकेरीत प्रतिस्पर्ध्यांवर मात करत पुढील फेरीत स्थान मिळविले. मात्र, मिश्र दुहेरीत टॉप सीडेड जोडी सनील शेट्टी आणि रीथ रिश्या यांना मात्र पराभव पत्करावा लागला.
सुरतच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय इनडोअर स्टेडियममध्ये टेबल टेनिस हा क्रीडा प्रकार खेळविला जात आहे. पुरुष एकेरीच्या सामन्यात तामिळनाडूच्या जी. साथियानने हरियाणाच्या वेस्ले रोझरियोचा 13-11, 11-6, 11-4, 11-5, गुजरातच्या मानव ठक्करने उत्तर प्रदेशच्या सार्थ मिश्राचा 11-5, 11-6, 11-6, 12-14, 11-6, पश्चिम बंगालच्या अनिर्बन घोषने गुजरातच्या इशान हिंगोरानीचा 11-8, 5-11, 11-9, 11-9, 11-3, गुजरातच्या हरमित देसाईने तेलंगणाच्या मोहम्मद अलीचा 11-4, 11-5, 11-6, 11-8, महाराष्ट्राच्या सनील शेट्टीने उत्तर प्रदेशच्या डी. श्रीवास्तवचा 11-6, 7-11, 9-11, 11-8, 11-9, 7-11, 11-9, गुजरातच्या मनुष शाहने कर्नाटकाच्या आकाशचा 11-5, 11-8, 11-2, 11-4, बंगालच्या सौम्यजित घोषने महाराष्ट्राच्या रिगन अल्बुकर्कचा 11-5, 4-11, 11-2, 10-12, 11-13, 11-7, 11-9, तामिळनाडूच्या शरथ कमलने महाराष्ट्राच्या रविंद्र कोटियानचा 11-9, 11-6, 11-6, 17-15 असा पराभव करून शेवटच्या 16 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.
महिलांच्या एकेरीमध्ये दिल्लीच्या मनिका बात्राने तेलंगणाच्या जी. प्रणिताचा 11-5, 11-8, 11-6, 11-8, पश्चिम बंगालच्या टी. सरकारने तेलंगणाच्या निखत बानूचा 9-11, 11-6, 11-6, 11-9, 14-12, मध्यप्रदेशच्या अनुषा कुटुंबळेने हरियाणाच्या रिती शंकरचा 11-5, 11-6, 11-7, 11-9, महाराष्ट्राच्या रीथ रिश्याने तामिळनाडूच्या हरशिववर्धिनीचा 13-11, 11-6, 11-8, 11-2, 11-3, दिया चितळेने हरियाणाच्या त्रिशा पॉलचा 11-3, 11-6, 11-4, 12-10, हरियाणाच्या सुहाना सैनीने पश्चिम बंगालच्या पी. सेनचा 13-15, 11-7, 13-11, 11-6, 8-11, 14-12, महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोषने तामिळनाडूच्या कौशिकाचा 11-8, 11-7, 11-5, 11-6 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.
मिश्र दुहेरीत टॉप सीडेड जोडी सनील शेट्टी आणि रीथ रिश्या यांचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच समाप्त झाले. मिश्र दुहेरीच्या सामन्यात मानव ठक्कर आणि कद्री या गुजरातच्या जोडीने महाराष्ट्राच्या सनील शेट्टी व रीथ रिश्या यांचा 11-7, 11-8, 11-7, अनिर्बन घोष व मौमा दास या पश्चिम बंगालच्या जोडीने तेलंगणाच्या मोहम्मद अली व वरुणी जैस्वाल यांचा 11-3, 9-11, 11-6, 11-8, 11-4 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.