वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय सीम बॉलर अष्टपैलू शार्दुल ठाकुर याची दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभाग संघात निवड करण्यात आली होती. पण आता त्याला न्यूझीलंड अ विरुद्ध होणाऱया अनधिकृत कसोटीसाठी भारत अ संघात निवड करण्याती आली आहे. तीन सामन्यांची ही मालिका बेंगळूरमध्ये सुरू आहे.
शार्दुल भारत अ संघातून खेळणार असल्याने पश्चिम विभागाने त्याच्या जागी सौराष्ट्रच्या 24 वर्षीय चेतन साकरियाची निवड केली आहे. साकरियाने भारतासाठी 1 वनडे व 2 टी-20 सामने खेळले आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये लंका दौऱयात त्याला ही संधी मिळाली होती. सध्या भारत अ व न्यूझीलंड अ यांच्यातील सामना सुरू असून दुसऱया सामन्यापासून शार्दुल या संघात सामील होणार आहे. हा सामना 8 सप्टेंबरपासून हुबळीत होणार आहे. भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक तुषार आरोठे पश्चिम विभागाचे प्रशिक्षकपद सांभाळणार आहेत.