वृत्तसंस्था/मुंबई
अदानी समूहातील अदानी पॉवर कंपनीचा समभाग शेअरबाजारात चमकताना दिसला आहे. सदरच्या समभागाला मंगळवारी अप्पर सर्कीट लागला होता. बीएसईवर समभाग 5 टक्के वाढत 171 रुपयांवर उच्चांकी स्तरावर कार्यरत होता. सलग दुसऱया सत्रात समभागाला अप्पर सर्कीट लागला आहे. निफ्टी 500, निफ्टी 200, निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी मिडकॅप 150, निफ्टी लार्ज मिडकॅप 250 आणि निफ्टी मिडस्मॉलकॅप 400 निर्देशांकात सदरच्या कंपनीचा समभाग समाविष्ट झाला आहे.