मुंबई
सिमेंट उद्योग जगतातील मोठी कंपनी अंबुजा सिमेंटचा समभाग भारतीय शेअरबाजारात सोमवारी चांगलाच चमकलेला दिसला. अंबुजा सिमेंटच्या समभागाचा भाव सोमवारी बीएसईवर इंट्रा-डे दरम्यान 10 टक्के वाढीसह 568 रुपयांवर पोहोचला होता. उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी समूहाकडून अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ समभाग बाजारात वधारताना दिसला.