मुंबई
देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचा समभाग मंगळवारी शेअर बाजारात घसरणीत राहिल्याचे दिसून आले. जवळपास कंपनीचा समभाग मंगळवारी बीएसईवर इंट्राडेदरम्यान 7 टक्के इतका घसरला होता. समभागाचा भाव 182 रुपयांवर पोहचला होता. सकाळी 9.20 वाजता हा समभाग 4 टक्के इतका घसरणीत होता. गेल्या महिन्याभरात हा समभाग 12 टक्के इतका वाढला आहे. वर्षभरात 57 टक्के समभागात वाढ झाली आहे.