मुंबई
भारतीय शेअर बाजारामध्ये जस्ट डायलच्या समभागाने तेजीचा सूर पकडला असल्याचे दिसले आहे. बीएसईवर बुधवारी इंट्रा डे दरम्यान जस्ट डायलचा समभाग 6.83 टक्के वाढत 680 रुपयांवर पोहोचला होता. याआधी हा समभाग 636 रुपयांवर बंद झाला होता. तिसऱया तिमाहीमध्ये कंपनीने चांगला नफा कमावल्याने त्याचा सकारात्मक परिणाम समभागावर बुधवारी पाहायला मिळाला. नफ्याच्या घोषणेनंतर समभाग आतापर्यंत 15 टक्के इतका वाढला आहे.