मुंबई
महिंद्रा हॉलीडे अँड रिसॉर्टस इंडिया लिमिटेड यांचा समभाग मंगळवारी नवी विक्रमी उंची गाठताना दिसला. कंपनीच्या समभागाने मंगळवारी बीएसईवर 9 टक्के इतकी तेजी दर्शवत 313 रुपयांवर पोहचण्याची किमया साध्य केली आहे. कंपनीच्या व्यवसायाने चांगली प्रगती साध्य केल्यामुळे त्याचे सकारात्मक प्रतिसाद समभागावर दिसले आहेत. याआधी कंपनीच्या समभागाने 10 जुलै 2017 रोजी 312 रुपयांचा सर्वोच्च स्तर गाठला होता.