मुंबई : भारतातील दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग सध्या शेअरबाजारात घसरणीचा कल दाखवत असल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. गेल्या 6 दिवसात हा समभाग जवळपास 9 टक्के इतका घटला आहे. गुरुवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान समभाग 1.3 टक्के घसरत 2207 रुपयांवर खाली आला आहे. हा भाव 52 आठवडय़ाच्या नीचांकावर राहिला आहे. याआधी 8 मार्च 2022 ला कंपनीच्या समभागाने 2181 रुपयांची पातळी गाठली होती.


previous post
next post