मुंबई
सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीचा समभाग बुधवारी शेअरबाजारात 5 टक्के इतका वाढलेला दिसला. कंपनीचा समभाग अशाप्रकारे 52 आठवड्याच्या उच्चांकी भावावर स्थिर होण्यात यशस्वी झाला. सदरची वाढ ही आयटी कंपनीला 160 दशलक्ष डॉलर्सची ऑर्डर मिळाल्यामुळे झाल्याचे सांगितले जाते. समभाग बुधवारी शेअरबाजारात वधारत 844 भावावर व्यवहार करत होता. आजपर्यंतच्या कालावधीत यावर्षी हा समभाग 43 टक्के इतका वाढला आहे.