मुंबई
दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडियाचा समभाग सोमवारी वधारताना दिसला. सरकारने सदरच्या कंपनीच्या व्याज बाकी फेडीसाठी समभागाचा पर्याय मान्य केला आहे. या बातमीचा सकारात्मक परिणाम समभागावर दिसला. 24 टक्के वाढीसह व्होडाफोनचा समभाग 8.57 रुपये इतका शेअरबाजारात झाला होता. कंपनीच्या 7.70 कोटी समभागांमध्ये बीएसईवर व्यवहार झाल्याचे पाहायला मिळाले. गुंतवणूकदारांना याने काहीसा दिलासा नक्कीच मिळाला आहे.