बेळगाव / प्रतिनिधी
मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव यांच्यावतीने शनिवारी 104 वा ‘शरकत दिवस’ साजरा करण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या 114 शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी शरकत दिन साजरा केला जातो. 1918 मध्ये मेसापोटेमिया (सध्याचा इराक) येथे 114 मराठा सैनिकांनी आपल्या रक्ताने, धैर्याने व सहनशक्तीने एक अमरगाथा लिहिली. या शौर्याचा गौरव म्हणून बटालियनला ‘शरकत’ हा सन्मान देण्यात आला.
दोन विशि÷ सेवा ऑर्डर, 4 मिलिटरी क्रॉस, 6 भारतीय ऑर्डर ऑफ मेरीट, 16 भारतीय विशि÷ सेवा पदक आणि 8 मेन्शन इन डिस्पॅचिस असे एकूण 36 शौर्य पुरस्कार कमाविले आहेत. ही आजवर एका युनिटने केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. यानिमित्त मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सेवा बजावलेल्या सर्व अधिकारी व सैनिकांचे संमेलन भरविले जाते.
शरकत युद्ध स्मारक येथे पुष्पचक्र व पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांतर्फे सर्व शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडंट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांनी युद्ध स्मारकाला पुष्पहार अर्पण केला.