Tarun Bharat

लोकांची मने जिंकणारे शर्मा स्वीट्स

Advertisements

19:62 मध्ये बेळगावात व्यवसायाला सुरुवात : आजही बेळगावकरांच्या सेवेत कायम दिमाखात

बेळगाव : मारवाडी दाम्पत्य आपल्या उदरनिर्वाहासाठी घरोघरी जाऊन ताक विकण्याचा व्यवसाय करत असे. मात्र मिठाई व्यवसाय करण्याची कल्पना ओझा दाम्पत्याच्या मनात आली. लहान-लहान मिठाई करून विकत असताना शर्मा स्वीट्सची स्थापना भवरलाल ओझा आणि अयोध्याबाई ओझा यांनी 1962 मध्ये बेळगाव येथे करून व्यवसाय सुरू केला.

प्रारंभी हा व्यवसाय अत्यंत संथगतीने सुरू झाला. मात्र त्यानंतर लोकांच्या पसंतीला उतरत चांगल्या दर्जाचे पदार्थ तयार करून विक्रीस ठेवण्यात आले. त्यामुळे शर्मा स्वीट्सचे नाव सर्वत्र पसरले. त्यानंतर आता दुसऱया पिढीनेही म्हणजे श्रीनिवास, राजगोपाल आणि गिरीश ओझा यांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला. त्याला आतापर्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

कुंदा हा बेळगावचा मानबिंदू आहे. शहराच्या कानाकोपऱयात कुंदा मिळत असला तरी शर्मा स्वीट्समधील हा कुंदा साऱयांच्याच पसंतीचा आहे. कुंदा किमान आठ दिवस टिकतो. त्यामुळे परराज्यात वा परदेशात नेण्यासाठी शर्मा स्वीट्समधील कुंदा फेमस आहे. कुंद्याबरोबरच कच्ची दाभेलीदेखील शर्मा स्वीट्सची खासीयत आहे. 1997 मध्ये पहिल्यांदाच शर्मा स्वीट्स यांनी दाभेली सुरू केली. तिही लोकांना भावली. त्यानंतर पावभाजी, पाणीपुरी, शेवपुरी, भेळपुरी आणि इतर पदार्थदेखील आता लोकांना आवडत आहेत. त्यामुळे ग्राहकांचा ओढा वाढला आहे.

बेळगाव परिसरातील नागरिक असोत वा बाहेरून आलेले पर्यटक, शर्मा स्वीट्सला भेट दिल्याशिवाय राहत नाहीत. शर्मा स्वीट्समध्ये पाणीपुरीसाठी सिंधीपुरी वापरली जाते. विशेष चाटसाठी आता शर्मा स्वीट्स प्रसिद्ध होत आहे. सहा दशके उलटली आणि तिसरी पिढी दीपक, सागर, अमित व अभिषेक ओझा हा वारसा पुढे चालवत आहेत. आजही त्याच दिमाखात हे स्वीट मार्ट बेळगावकरांच्या सेवेत कायम आहे.

Related Stories

जवाहर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन उत्साहात

Patil_p

राष्ट्रीय महामार्ग लुटारूंसाठी राजमार्ग

Amit Kulkarni

काकती येथील शिवप्रेमींकडून गडकोट मोहीम

Amit Kulkarni

एटीएम केंद्रात शॉर्टसर्किटने आग

Patil_p

‘बेळगाव श्री’ शरीरसौष्टव स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

झाडाला ओमनी धडकल्याने दोघे गंभीर जखमी

Amit Kulkarni
error: Content is protected !!