Tarun Bharat

विचारांच्या ताकदीने लढतो तोच संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता-शशिकांत शिंदे

सातारा,प्रतिनिधी

सातारा: संभाजी ब्रिगेडची ओळख विचाराने घेतली जाते, तुमच्या सारख्या अनेक संघटना महाराष्ट्रात विचार घेऊन लढत आहेत. गेल्या पाच सहा वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही संघटना गेली आहे. कार्यकर्त्याला संधी मिळाली की नेत्यांचे विश्वास संपादन करत असतो, पण आपली ओळख स्वतःच्या ताकतीवर केली तर त्याचा फायदा संघटनेला होत असतो. विचारांच्या ताकदीने लढतो तोच खरा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता असतो, असे मत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय अधिवेशन साताऱ्यात यवतेश्वर येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, गेल्या 25 वर्षांत राज्याच्या राजकारणात असताना मी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली आहे. संघटनेच्या ओळखीच्या माध्यमातून पुढे यावे. परिणामांचा विचार न करता ही संघटना पुढे चालली आहे. राजकारणात जागा असून सध्या चांगल्या विचारांची संघटनेला गरज आहे. समोर बसलेल्यांना वाटलं पाहिजे. तो जिह्याला हरवू शकत. संभाजी ब्रिगेड या नावात दम आहे. अधिकाऱ्यांपूढे जाऊन बोलण्याची ताकत आहे. सातारा जिह्यात सर्वात जास्त सैनिक असल्याने हा जिल्हा सैनिकांचा म्हणून ओळखला जातो. या देशात अग्निपथचा विषय पाहिला तर तीन ते चार राज्यापुरता झाला. देशाच्या सुरक्षिततेसाठी पाच वर्षे काम करायचं अन त्यापुढे त्याला पेन्शन नाही. याला विरोध झाला तरी केंद्र सरकार ठामच राहिले. पाच टक्के जीएसटी होऊनही आंदोलन तीव्र झालेले नाही. त्यामुळे एका दिवशी श्रीलंके सारखी आपल्या देशाची अवस्था होऊ नये, अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- जनतेच्या समस्या सोडवणे नगरसेवकांचे कर्तव्य-शिवेंद्रराजे भोसले


पुढे ते म्हणाले, तुमची संभाजी ब्रिगेडची ओळख राज्यात व्हावी इतकी की राज्याने पायघड्या घातल्या पाहिजेत. तरुणपणाची रग दाखवण्याचा प्रयत्न करा. या देशातील सत्ता बदलण्याची ताकत तरुणाच्यांत आहे. त्यादृष्टीनं आपले प्रयत्न व्हावेत. आज सत्ता बदल झाली आहे पण किती दिवस टिकेल हे सांगता येत नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले असते पण राज्यातील उद्रेक पाहता त्यांना होता आलं नाही. एवढ्या ठामपणाने राहा की कोणताही प्रश्न असो तिथं संभाजी ब्रिगेड ने पुढे यावे एवढी ओळख करा. आपल्या अडीअडचणी माझ्यापर्यंत पोहोचवा जेवढे जमेल तेवढे सोडवण्याचा प्रयत्न करू. एवढा शब्द आज मी देतो, असे आश्वासन आमदार शशिकांत शिंदे यांनी दिले. अमोल काटे यांच्यासह मानन्ररांनी आपले मत व्यक्त केले.

Related Stories

दिव्यांगांचा निधी खर्च करण्याची मागणी

datta jadhav

पृथ्वीराज चव्हाणांचा दिल्लीतील अधिकाऱयांशी संपर्क

Patil_p

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : रासपची मागणी

Patil_p

सातारा : वाईमध्ये मुलींची शाळा जमीनदोस्त

datta jadhav

सातारा जिह्यातील 13 केंद्रावर होणार ‘नीट’ परिक्षा

Archana Banage

माण बाजार समितीच्या 18 जागांसाठी 103 उमेदवारी अर्ज

datta jadhav