Tarun Bharat

शौकत अहमद शेख दहशतवादी घोषित

Advertisements

हिज्ब-उल-मुजाहिदीनचा प्रमुख कमांडर ः युएपीए अंतर्गत केंद्राची कारवाई

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

हिज्ब-उल-मुजाहिदीनचा मुख्य लाँचिंग कमांडर शौकत अहमद शेखला युएपीए अंतर्गत केंद्र सरकारने मंगळवारी दहशतवादी घोषित केले आहे. जम्मू-काश्मीरयच बारामुल्ला येथील गनी हमाम भागाचा रहिवासी शौकत उर्फ शौकत मोची सध्या पाकिस्तानात आहे.

दहशतवाद्यांची घुसखोरी आणि दहशतवाद्यांच्या भरतीत सामील असल्याचा आणि दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा शौकतवर आरोप आहे. युएपीएतील कलम 35 (1) (अ) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत केंद्र सरकारने शौकत अहमद शेखला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. हिज्ब-उल-मुजाहिदीनला युएपीए अधिनियमाच्या पहिल्या अनुसूची अंतर्गत दहशतवादी संघटनांच्या यादीत सामील करण्यात आले आहे.

Related Stories

अमेरिकेत मेगा रॉकेटची चाचणी यशस्वी

Patil_p

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू…खरं काय?

Rohan_P

रशियाला युद्ध थांबवायला सांगा; युक्रेनचे भारताला आवाहन

Abhijeet Shinde

6 लाख कोटींच्या संपत्तीनिर्माणाची योजना

Patil_p

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाहिली महात्मा गांधी यांना श्रध्दांजली

Rohan_P

जयपूरमध्ये मायलेकाची हत्या

Patil_p
error: Content is protected !!