प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेने सोमवारी सायंकाळी न्यू मार्केट बाहेर वसंत भूवन हा?टेलला भिडून असलेल्या दोन गाडेवजा दुकानांचे बेकायदा शेड व विस्तार हटविले. पोलीस सरंक्षणात ही कारवाई करण्यात आली.
मार्केट निरिक्षक सांतो फर्ना?डिस यांनी पालिकेचे कारवाई पथक घेऊन दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सदर कारवाईस सुरूवात केली व तासाभरांत एका गाडेवजा दुकानाचे फेब्रिकेशन तसेच लोखंडी पत्रे घालून उभारण्यात आलेली पक्की शेड कटरच्या साहाय्याने कापून काढण्यात आली. पालिकेने सदर शेड जप्त केली असली तरी वरील गाडेचालकांचा माल मात्र जप्त केला नसल्याची माहिती मार्केट निरिक्षक फर्ना?डिस यांनी दिली.
दिलीप कोटे व राजेश आडपईकर यांच्या मालकीचे सदर गाडेवजा दुकाने होती. त्यांनी बेकायदा विस्तार करून ती थाटली होती असे त्यांनी सांगितले. पालिकेकडे यासंदर्भात तक्रारी आल्या होत्या तसेच सोशल मिडियावर याप्रकरणी कारवाई होत नसल्याने पालिकेवर टीका करण्यात येत होती, असे फर्ना?डिस यांनी सांगितले.
मुख्याधिकारी आग्नेल फर्ना?डिस यांनी या बेकायदा गाडांचा अहवाल सादर करण्यास सांगितला होता त्यानुसार आपण अहवाल सादर केल्यानंतर मुख्याधिकाऱयांनी कारवाईचे आदेश काढले होते त्यानुसार ही कारवाई हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वरील गाडे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन दशकांपूर्वी हटविण्यात आले त्यांचे अन्य ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्यांत आलेले असताना काहीजण मूळ ठिकाणची जागेवर बेकायदा विस्तार करून व्यवसाय करत असल्याचे आढळून आले असून त्यासंदर्भात वाढत्या तक्रारी असल्याचे मुख्याधिकारी फर्ना?डिस यांनी सांगितले. दरम्यान पालिकेने मार्केट सभोवतील पदपथांवर व रस्त्यांच्याकडेला चाललेल्या बेकायदा विपेतांवर कारवाई करण्याची मागणी न्यू मार्केट टेडर्स संघटनेचे अध्यक्ष विनोद शिरोडकर यांनी केली आहे. पालिकेकडून कारवाईसाठी दिरंगाई झाल्यास व्यापाऱयांना पुढाकार घेऊन कारवाई करावी लागेल असा इशारा शिरोडकर यांनी दिला आहे.