पंकज त्रिपाठी यांचा चित्रपट
पंकज त्रिपाठी लवकरच स्वतःचा आगामी चित्रपट ‘शेरदिल ः द पीलीभीत सागा’द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज आहेत. टी-सीरिज आणि रिलायन्स एंटरटेनमेंटने मॅच प्रॉडक्शन्ससोबत मिळून हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्र सत्यघटनांवर आधारित असल्याचे समजते.
या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्रीजीत मुखर्जी यांनी केले आहे. तसेच पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. यापूर्वी त्यांनी ‘बेगम जान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. चित्रपटात शहरीकरणाचा प्रतिकूल प्रभाव, मानव-प्राणी संघर्ष आणि गरीबीसंबंधी एक कथा दर्शविण्यात येणार आहे. जंगलाच्या परिघावर वसलेल्या गावातील लोकांची ही कथा असणार आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पंकज त्रिपाठी हे सर्वसामान्य व्यक्तीच्या वेशभूषेत जंगलांमध्ये दिसून येत आहेत. सत्य घटनांनी प्रेरित या कथेत पंकज त्रिपाठी यांच्यासह नीरज काबी आणि सयानी गुप्ता देखील मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 24 जून रोजी मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट श्रीजीत यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.