Tarun Bharat

चौगुलेवाडीतील 16 जणांचे काळजी केंद्रात स्थलांतर

Advertisements

सोमवारी रात्री जिल्हाधिकारी-मनपा अधिकाऱयांनी दिली भेट

प्रतिनिधी/बेळगाव

शहरात पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले आहे. दरवषीप्रमाणे नानावाडी, मराठा कॉलनी आदी परिसरात रस्त्यांवर पाणी आले होते. चौगुलेवाडी येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील 4 कुटुंबातील 16 जणांना कैवल्य योग मंदिर येथील काळजी केंद्रात दाखल करण्यात आले आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास बुधवारी सोडण्यात येणार आहे.

शहरात एकूण 19 ठिकाणी काळजी केंद्रे सुरू करण्याची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास सर्व ठिकाणी काळजी केंद्रे सुरू करून पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणच्या नागरिकांना काळजी केंदात स्थलांतर करण्याची सूचना करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात आणि नाला काठावरील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे चौगुलेवाडीतील घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे कैवल्य योग मंदिर येथे काळजी केंद्र सुरू करून चौगुलेवाडीतील नागरिकांना सोमवारी संध्याकाळी स्थलांतर करण्यात आले. चार कुटुंबातील 16 जणांचा समावेश असून यामध्ये आठ लहान मुले आहेत. सोमवारी रात्री उशिरा या केंद्राची पाहणी जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि महापालिका आयुक्त रुदेश घाळी, महापालिकेच्या सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी केली. तसेच नागरिकांची काळजी घेऊन त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची सूचना अधिकाऱयांना करण्यात आली.

शहरातील काही भागात पावसाचे पाणी शिरल्याने घरांमध्ये राहणे मुश्कील बनत आहे. त्यामुळे काळजी केंदे सज्ज ठेवण्याची सूचनादेखील मनपा अधिकाऱयांना करण्यात आली. पूरपरिस्थितीची माहिती घेऊन सोमवारी सायंकाळी काळजी केंद्रात दाखल झालेल्या नागरिकांना बुधवारी सकाळी घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कैवल्य योग मंदिर येथे सुरू केलेल्या काळजी केंद्राची जबाबदारी कौन्सिल विभागाचे रवी मास्तीहोळीमठ यांच्याकडे सोपविली आहे.

Related Stories

खानापूर बेळगाव राष्ट्रीय मार्गावरही आता नाकेबंदी

Rohan_P

चित्र स्पष्ट, लढती निश्चित

Patil_p

विमानतळ प्राधिकरणाकडून बेळगाव विमानतळाचे कौतुक

Patil_p

जिल्हय़ातील 402 जणांचे अहवाल निगेटिव्ह

Amit Kulkarni

हॉस्पिटलवर कायदेशीर कारवाई करणार

Patil_p

समर्थनगर येथील माउली ग्रुपतर्फे अन्नधान्य वाटप

Amit Kulkarni
error: Content is protected !!