Tarun Bharat

‘लोकमान्य’च्या कॅम्प शाखेचे नव्या वास्तुत स्थलांतर

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या कॅम्प शाखेचे नव्या वास्तुत नुकतेच स्थलांतर करण्यात आले. कॅम्प परिसरातील चर्च स्ट्रीट भागात ही शाखा झाली असून ग्राहकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

यानिमित्त सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. यावेळी असंख्य ग्राहकांनी नव्या शाखेस भेट देऊन शुभेच्छा
दिल्या.

सोसायटीचे संचालक प्रभाकर पाटकर, पंढरी परब, गजानन धामणेकर, विठ्ठल प्रभू यांनीसुद्धा कार्यक्रमास उपस्थित राहून नव्या शाखेस व कर्मचाऱयांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बेळगावचे रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी व असिस्टंट रिजनल मॅनेजर सी. आर. पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमप्रसंगी कॅम्प शाखेचे व्यवस्थापक गामा रोजारिओ, रोहन मेहंदळे व अंकिता चौगुले, अर्जुन पाटील, दिपाली भातकांडे आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी विनायक पाटील आणि परशराम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Stories

हालशुगर मल्टीस्टेट करण्याचा सर्वानुमते ठराव

Patil_p

कडलास्कर बुवा यांच्या 18 व्या पुण्यतिथीनिमित्त संगीत मैफल कार्यक्रम

Patil_p

इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिलतर्फे आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धा

Amit Kulkarni

अनमोड घाटात वाहन दरीत कोसळले

Amit Kulkarni

जिल्हय़ातील सार्वजनिक वाचनालयांना उतरती कळा

Amit Kulkarni

‘मी जिवंत आहे’मुळे प्रकरणाचा छडा

Amit Kulkarni
error: Content is protected !!