कित्येक वर्षांपासून केसांसाठी शिकेकाईचा वापर केला जात आहे.या औषधी वनस्पतीचे अनेक फायदे आहेत जे केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. शिकेकाईचे अनेक चमत्कारिक फायदे आहेत. जर शिकेकाईचा नियमित वापर केला तर केसांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.आज आपण याचे कोणते फायदे आहेत,ते जाणून घेऊयात.
आजकाल बऱ्याच जणांचे केस अकाली पांढरी होतात. मग यावर केमिकलयुक्त रंगाने केस कलर केले जातात ज्यामुळे केस खराब ही होऊ शकतात.पण या समस्येवर शिकेकाई प्रभावी ठरते. शिकेकाई केवळ केस अकाली पांढरे होण्यापासून रोखत नाही तर काळ्या केसांचे सौंदर्य देखील टिकवून ठेवते. यासाठी आठवड्यातून एकदा शिकेकाई, आवळा पावडरचा हेअर पॅक केसांना लावा.
शिकेकाईमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो. याशिवाय ते डेड स्किन सेल तयार होणे आणि केसांची मुळे गळणे यासारख्या समस्यांना प्रतिबंध करते.
नवीन केसांची वाढ निरोगी स्काल्पवर अवलंबून असते. केसांसाठी शिकेकाई वापरल्याने स्काल्पची हेल्थ सुधारते,त्याचबरोबर केसांच्या वाढीसही मदत होते.
शिकेकाईचे तुरट गुणधर्म केसांची चमक वाढवण्यास मदत करतात. केसांची निगा राखण्यासाठी शिकेकाईचा वापर करून केसांमधला घाम काढून केस चमकदार आणि सुंदर बनवू शकता.
(टीप : वरील माहिती हि सर्वसामान्य माहितीवर आधारित असून कोणताही उपाय करण्याआधी वैद्यकीय किंवा सौंदर्यतज्ञांचा सल्ला घ्यावा.)

