Tarun Bharat

‘वंडर वुमन’ होऊन परतली शिल्पा

निकम्मा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने चार दिवसांपूर्वी सोशल मीडियापासून बेक घेण्याची घोषणा करता सर्वांना चकित केले होते. शिल्पाने सोमवारी स्वतःच्या नव्या अवतारासह इन्स्टाग्रामवर जोरदार पुनरागमन केले आहे. हा नवा अवतार साधा नाही. शिल्पाने मोशन पोस्टर शेअर केले असून यात ती वंडर वुमनसारख्या अवतारात दिसून येत आहे. या छायाचित्रात शिल्पाने निळय़ा आणि लाग रंगातील सुपरहीरोचा पोशाख धारण केला आहे. तर तिच्या हातात एक तलावर दिसून येतेय.

Advertisements

‘आम्ही आता बोलत आहोत, एकदम नव्या अवतारात. खरी अवनी कोण’ असे तिने पोस्टरच्या कॅप्शनमध्ये नमूद केले आहे. शिल्पाचा हा अवतार तिचा आगामी चित्रपट निकम्माशी निगडित आहे. याचा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित केला जाणार आहे. शिल्पाच्या सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यामागे निकम्माचे प्रमोशनच आहे.

साबिर खान दिग्दर्शित निकम्मा हा एक विनोदी धाटणीचा चित्रपट असून यात अभिमन्यू दसानी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्लीन सेतिया मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक सादर करण्यात आला असून यात अभिमन्यू आणि शर्ली दिसून आली आहे. चित्रपटात शिल्पा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

शिल्पा याचबरोबर रोहित शेट्टीची पहिली वेबसीरिज ‘इंडियन पोलीस फोर्स’मध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. तर विवेक ओबेरॉय देखील पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे.

Related Stories

अनुराधा पौडवाल माझी आई, केरळमधल्या महिलेचा दावा

prashant_c

ऋतिकसोबत दिसून येणार दीपिका

Patil_p

सुशांत आत्महत्या : बिहार सरकारकडून CBI चौकशीची शिफारस

Rohan_P

सई ताम्हणकरला मिळाला ड्रिमबॉय

Patil_p

अनिता हसनंदानीने दिली गुड न्यूज!

Rohan_P

शाहरुखची नायिका होणार नयनतारा

Patil_p
error: Content is protected !!