रोहित शेट्टीकडून निर्मित वेबसीरिज
रोहित शेट्टी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. आतापर्यंत त्याचे कॉप युनिव्हर्सचे चित्रपट सिंघम, सिंबा, सूर्यवंशी हे मोठय़ा पडद्यावर प्रदर्शित झाले आहेत. परंतु आता ही ऍक्शन ओटीटीवर पाहता येणार आहे. यापूर्वी सिद्धार्थ मल्होत्राची पोलीस अधिकाऱयाच्या स्वरुपात झलक दाखविण्यात आली होती. आता शिल्पा शेट्टीचे धमाकेदार पोस्टर समोर आले आहे. शिल्पा आता रोहितच्या या प्रोजेक्टचा महत्त्वाचा हिस्सा आहे.
रोहितच्या कॉप युनिव्हर्समध्ये शिल्पा महिला पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत असणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्वतःचा लुक शेअर करत तपशील दिला आहे. पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर जलवा दाखविण्यासाठी सज्ज असल्याचे तिने म्हटले आहे.
हातात बंदूक, डोळय़ांवर काळा गॉगल आणि पोलिसांच्या गणवेशातील शिल्पाच्या लुकला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. शिल्पा याचबरोबर ‘निकम्मा’ या चित्रपटातही दिसून येणार आहे. तसेच ती एका चॅट शोचे सूत्रसंचालन करत आहे.