Tarun Bharat

महापालिका निवडणुकीत शिंदे-भाजप एकत्र, ‘या’ महापालिकेत युतीचा नारळ फुटला

muncipalelection; राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दणका देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापन केली. त्यांची हि जोडी इथून पुढच्या सर्व निवडणुकीत एकत्र राहण्याचे ठरवले आहे. आगामी मुंबई, पुणे, औरंगाबादसह अनेक महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिंदे गट आणि भाजप आगामी महानगरपालिका निवडणुकाही एकत्र लढवणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation Election) निवडणुकांच्या निमित्ताने नव्या युतीचा नारळ फुटला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजप आणि शिंदे गटात जागावाटपाबाबत प्राथमिक बैठक झाली. शिंदे गटातील औरंगाबाद जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी याबाबत माहिती दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे-भाजप सरकार एकत्रित सामोरं जाणार आहेत.औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्याचं घोषित करत शिंदेंनी आधीच मास्टरस्ट्रोक मारला आहे. औरंगाबादमधील सर्वच्या सर्व सहा शिवसेना आमदार फुटून शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिवसेना आधीच खिळखिळी झाली आहे. त्यातच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिंदे गट एकत्र निवडणुकांना सामोरा गेल्यास उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाली शिवसेनेची कोंडी होऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय झालाय. जागावाटपाबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेऊ. औरंगाबादमधील अनेक चांगले नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. हिंदुत्वासाठी एकत्र निवडणूक लढवणार आहोत. त्यामुळे आम्हाला चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा जंजाळ यांनी व्यक्त केली.

Related Stories

सोलापूर : चालू वर्षाच्या मिळकत कराच्या बिलावर महिनाअखेर पर्यंत ५ टक्के सवलत

Archana Banage

अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे टेंभू योजनेतील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Abhijeet Khandekar

”महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर त्यामुळे नरेंद्र मोदी तिथला दौरा करत असतील”

Archana Banage

सांगलीतील आमराईचा चेहरा-मोहरा बदलला

Archana Banage

मिनी ऑलंपिक साठी सोमनाथ गोंधळी यांची पंच म्हणून निवड

Anuja Kudatarkar

मोहालीत इंटेलिजन्स ब्युरोच्या इमारतीवर रॉकेटसदृश्य हल्ला

datta jadhav