Tarun Bharat

शिंदे-फडणवीसांचे सरकार मोदी-शाहांचे गुलाम

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

शिंदे-फडणवीस सरकारला राज्यातल्या जनतेशी काहीही देणंघेणं नाही. हे सरकार मोदी-शाहांचे गुलाम आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा दीड लाख कोटींचा प्रकल्प त्यांनी गुजरातला जाऊ दिला. आता दोन वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेऊ अशी वल्गना देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांनी 2014 ते 2019 या कालावधीत राज्यातील किती संस्था व प्रकल्प गुजरातला गेले याची यादी द्यावी, असे आव्हान पटोले यांनी यावेळी दिले. 

काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील अनेक संस्था आणि प्रकल्प गुजरातला गेले. ऐवढेच नाही राज्याचे पाणी सुद्ध त्यांनी गुजरातला दिले. आता तेच फडणवीस दोन वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेण्याची भाषा करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना काय काय गुजरातला गेले याची यादी त्यांनी द्यावी.

तसेच नोटबंदीच्या काळात देशात जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यातून मिळालेल्या पैशातून भाजपने देशभरात जागा घेतल्या. याच पैशातून आमदार विकत घेतले जात आहेत. भय आणि भ्रष्टाचाराचे राजकारण करून लोकशाही विकत घेण्याचे काम केले जात आहे. आम्ही मात्र देश वाचवण्याचे काम करू.

Related Stories

‘पतंजली’ला बदमान करण्यासाठी मोठं षडयंत्र ; बाबा रामदेव यांचा आरोप

Archana Banage

लाँकडाऊन मुळे रखडलेल्या कामांना मिळणार गती

Patil_p

सोशल डिस्टन्स पाळून ताजी ताजी भाजी

Patil_p

‘अमृत’ च्या नावाखाली ‘विष’?

Abhijeet Shinde

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का – अशोक चव्हाण

Abhijeet Shinde

नवे सात रूग्ण, सहा कोरोनामुक्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!