Tarun Bharat

शिंदे गट आदित्य ठाकरेंवर मेहेरबान!

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

बहुमताच्या चाचणीवेळी शिवसेनेच्या 15 आमदारांनी व्हिपचे उल्लंघन केल्यामुळे शिंदे गटाने आदित्य ठाकरे वगळता इतर 14 आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेमापोटी आदित्य ठाकरे यांना या नोटीसमधून वगळण्यात आल्याचे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटले आहे.

काल विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारने बहुमत चाचणी पास केली. शिंदे-फडणवीस सरकारला 164 तर विरोधातील महाविकास आघाडीला 99 मतं मिळाली. या बहुमत चाचणीसाठी शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटातील 15 आमदारांना व्हिप बजावला होता. तर शिवसेनेच्या वतीनेही सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला होता. पण विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवड वैध ठरवल्यामुळे ठाकरे गटातील 15 आमदारांवर कारवाईची शक्यता होती. त्यानुसार काल बहुमत चाचणी झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आदित्य ठाकरे वगळता 14 आमदारांना निलंबनाची नोटीस पाठवली. बाळासाहेब ठाकरेंवरील प्रेमापोटी आदित्य ठाकरेंना निलंबनाची नोटीस पाठविण्यात आली नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील, असे गोगावले यांनी म्हटले आहे.

आमदारांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार सुनील प्रभू हेच शिवसेनेचे अधिकृत प्रतोद आहेत आणि त्यांचाच व्हीप कायदेशीर आहे. शिवसेनेच्या आमदारांना त्यांचाच व्हीप लागू होईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, कुणाचा व्हीप खरा आणि कुणाचा खोटा यावरुन कायदेशीर लढा आता सुरू आहे. 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यात जर शिवसेनेच्या विरोधात निकाल लागला तर 14 जणांची आमदारकी रद्द होऊ शकते. असे झाल्यास शिवसेना आणि शिंदे गटातील वाद पेटू शकतो.

Related Stories

मुंबई पोलिसांकडून 2,200 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त

Tousif Mujawar

साताऱयात भररस्त्यात 150 जणांची कोरोना चाचणी

Patil_p

”हे” दांपत्य यंदा करणार विठूरायाची महापूजा

Archana Banage

#TokyoParalympics : गूगलचे खास डूडल पाहिले का ?

Archana Banage

महाराष्ट्रात 4,153 नवे कोरोना रुग्ण; 30 मृत्यू

Tousif Mujawar

रूग्णांच्या नातेवाईकांना मिळणार पास

Patil_p
error: Content is protected !!