ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटाचे बंडखोर आमदार गोव्याहून (Goa) मुंबई दाखल झाले आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. भाजपचे आमदार प्रसाद लाड हे त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. आता ते विशेष बसने ताज प्रेसिडंटकडे रवाना झाले आहेत. मुंबई विमानतळ ते ताज प्रेसिडंटपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.
मुंबई पोलीस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यावेळी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली आणि पोलिसांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. गोव्यातून बंडखोर आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस सतर्क असून सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई वाहतूक पोलीस गिरगांव चौपाटीजवळ रस्त्यावर कोणतेही वाहन उभे करून दिलेलं नाही.