Tarun Bharat

Mumbai Politics : सरवणकरांच्या कार्यालयावर दगडफेक करत बॅनर्स फाडले

ऑनलाईन टीम/तरुण भारत

Shivsena vs Shinde Group In Dadar : दादरमध्ये शिवसैनिक आणि शिंदे गटात मोठा राडा झाला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांच्या दादर येथील कार्यालयावर दगडफेक करत त्यांचे बॅनर्स देखील फाडले. त्यामुळे आता शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात गणेश मिरवणुकीवरून सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण लागलं आहे.

दरम्यान, गणेश विसर्जनावेळी मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता दोन्ही गटातील संघर्ष शिगेला पोहचला असून शिवसैनिकांनी माहिम आणि दादरमध्ये आमदार सदा सरवणकर यांचे पोस्टर फाडले आहेत. याशिवाय आमदार सरवणकर यांच्या संपर्क कार्यालयांवर दगडफेक झाल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता शिवसेना आणि शिंदे गटात गणेश मिरवणुकीवरून सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण लागलं आहे.

यावेळी सदा सरवणकर यांनी बंदुकीचा धाक दाखवून दमबाजी केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. तसेच त्यांनी गोळीबार केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली होती. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचे बॅनर्स फाडले आहेत. त्यामुळे शिंदे गटाकडूनही शिवसेनेला उत्तर दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा समाधान सरवणकर, संतोष तेलवणे यांच्यासह १० जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तर ठाकरे गटाच्या पाचही जणांना जामिनावर सोडले जाणार आहे.

Related Stories

पुणे विभागातील 5 लाख 6 हजार 681रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

कोल्हापूर जिल्हय़ात ७ कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

कर्नाटक: भाजप विधिमंडळाची ७ वाजता बैठक, नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची होणार घोषणा

Archana Banage

साखर निर्यात बंदी निर्णय शेतकरी व साखर उद्योगाला खड्डयात घालणारा- राजू शेट्टी

Archana Banage

पाचगाव नागरिकांचे आरोग्य धोक्यात, पाण्याच्या नळाला दुर्गंधीयुक्त पाणी

Archana Banage

Sangli:शिराळ्यात अपघात, १ ठार ५ जखमी

Rahul Gadkar