शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी मंदिरात केली प्रार्थना ः मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
शिवसेनेच्या बंडखोर तसेच काही अपक्ष आमदारांनी बुधवारी आसाममधील कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले व पूजा केली. मागील काही दिवसांपासून गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडत या आमदारांनी कामाख्या मंदिराला भेट दिली आहे.
आसाम राज्य परिवहन महामंडळाच् या बसमधून मंदिराच्या दिशेने जात असताना या जवळपास 50 आमदारांसोबत आसामचे मंत्री पिजुष हजारिकादेखील होते. निलाचल पर्वतावर असलेल्या या मंदिरात पोहोचलेल्या आमदारांनी प्रसारमाध्यमांना विजयाची खूण दर्शविली आहे.
मंदिरात पूजा अन् प्रार्थना केल्यावर हे आमदार हॉटेलमध्ये परतले. तेथून ते गोव्याला जाण्यासाठी लोकप्रिय गोपिनाथ बोरडोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. विमानतळावर या आमदारांना गोव्यात नेण्यासाठी विशेष विमान सज्ज ठेवण्यात आले होते. स्पाईसजेटचे विमान याकरता भाडेतत्वावर घेण्यात आल्याचे समजते.
शिवसेनेचे बंडखोर आमदार कामाख्या मंदिरात पोहोचणार असल्याने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरि÷ पोलीस अधिकाऱयांसह शेकडो पोलिसांनी या मंदिराला एखाद्या किल्ल्याचे स्वरुप दिले होते. आमदारांची पूजा-प्रार्थना पूर्ण होईपर्यंत मंदिरात अन्य भाविकांना प्रवेशाची अनुमती नव्हती. तर बुधवारी सकाळी एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे कामाख्या मंदिरात जात प्रार्थना केली होती. औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आपण गुरुवारी मुंबईत परतणार असल्याचे शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिंदे यांनी या वक्तव्याद्वारे नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींमध्ये भाग घेण्याचे संकेत दिले आहेत